Ad will apear here
Next
‘मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, मराठा समाजाचा लढा यशस्वी’
भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांची प्रतिक्रिया
मुंबई : ‘भाजप महायुती सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व नोकरीत दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे अभिनंदन करत असून, मराठा समाजाने अनेक दशके दिलेल्या लढ्याचा आज ऐतिहासिक विजय झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांनी गुरुवारी (२७ जून) व्यक्त केली.

दानवे म्हणाले, ‘मराठा समाजातील मोठ्या वर्गाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची गरज आहे. त्यासाठी समाजाने दीर्घकाळ लढा दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाने राज्यात लाखा-लाखांचे ऐतिहासिक मोर्चे काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने विचार केला आणि सर्व वैधानिक प्रक्रिया पार पाडून मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी व न्यायालयात ते टिकण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिसमितीने मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनासाठी सातत्याने प्रयत्न केले. उच्च न्यायालयाने २७ जूनला मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरविल्यामुळे भाजप सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत व मराठा समाजाला ऐतिहासिक यश मिळाले आहे.’

‘भाजपने सातत्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्याचे स्पष्ट आश्वासन भाजपने दिले होते. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीनेही मराठा समाजाच्या आरक्षणाला ठराव करून पाठिंबा दिला होता,’ असे दानवे यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZGZCB
Similar Posts
‘भाजपने वचन पाळले, फडणवीस सरकारचे अभिनंदन’ मुंबई : ‘सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले वचन पाळले आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘भाजप’ प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी व्यक्त केली
भाजपच्या प्रत्येक जिल्हा शाखेतर्फे दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि ‘भाजप’ची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आ
‘सदस्यता अभियानात भाजप समाजाच्या सर्व घटकांना जोडणार’ मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा संघटनेच्या विस्तारासाठी सज्ज झाला असून, सदस्यता अभियानामार्फत भाजप समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्य, प्रगत, मागास, गरीब, श्रीमंत अशा सर्व घटकांना पक्षाबरोबर जोडून घेईल,’ असे भाजप सदस्यता अभियानाचे राष्ट्रीय
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएम चषकाचे उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे पुणे येथे आयोजित केलेल्या सीएम चषकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक नोव्हेंबर २०१८ रोजी होणार आहे. हडपसर येथील मगरपट्टा भागातील लक्ष्मी लॉन येथे सायंकाळी चार वाजता हा सोहळा पार पडेल. उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळाला अटल खेल नगरी नाव देण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language